मित्राच्या मुलीला ‘तो’ नशेच्या गोळ्या द्यायच्या अन्… प्रताप उघड झाल्यावर पीडीत मुलीच्या पित्याच्या पायाखालची जमीनच सरकरली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   वसईत एका महिलेसोबत लैंगिक शोषण केल्याची घटना घडलीय. एका नराधमानं नशेच्या गोळ्या देऊन मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केलंय. या प्रकरणात पीडित मुलगी आई झाली असून वालीव पोलिसांनी आरोपीला गजाआड केलंय. संबंधित मुलीला डोके दुखीचा त्रास होता. तिच्यावर उपचार करतो असे सांगून वडिलांच्या मित्रानं नशेच्या गोळ्या देत तिच्यावर सतत अत्याचार केला. […]

मित्राच्या मुलीला ‘तो’ नशेच्या गोळ्या द्यायच्या अन्… प्रताप उघड झाल्यावर पीडीत मुलीच्या पित्याच्या पायाखालची जमीनच सरकरली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

वसईत एका महिलेसोबत लैंगिक शोषण केल्याची घटना घडलीय. एका नराधमानं नशेच्या गोळ्या देऊन मित्राच्या मुलीचं लैंगिक शोषण केलंय.

या प्रकरणात पीडित मुलगी आई झाली असून वालीव पोलिसांनी आरोपीला गजाआड केलंय. संबंधित मुलीला डोके दुखीचा त्रास होता. तिच्यावर उपचार करतो असे सांगून वडिलांच्या मित्रानं नशेच्या गोळ्या देत तिच्यावर सतत अत्याचार केला.

हा प्रकार पीडित मुलीनं कोणालाही सांगितला नाही. मात्र, गरोदरपणात पोट दिसू लागल्यावर तिच्या वडीलांना हा प्रकार समजला आणि त्यांनी आरोपीविरोधात तक्रार दाखल केली.

आरोपीला अटक करण्यात आली असून आरोपी संजीवन चौधरीला 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number