जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
कर्जमाफी केल्यानंतर शेतकरी आत्महत्या थांबणार असतील, तर विरोधकांनी एकत्र यावं आणि शेतकरी आत्महत्या करणार नाहीत, असा लेखी प्रस्ताव द्यावा, असं अजब वक्तव्य भाजप
प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी केले आहे.
रावसाहेब दानवे आज शिर्डीत साईंच्या दर्शनाला आले होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केले. एकीकडे काँग्रेस-राष्ट्रवादीसह सर्व विरोधकांनी संघर्ष यात्रा काढून राज्यभरात शेतकरी कर्जमाफीची
मागणी लावून धरली.
त्यातच शेतकऱ्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या आत्महत्यांचं सत्र सुरुच असताना, दानवेंनी केलेल्या वक्तव्यामुळे वाद होण्याची चिन्हं आहेत. संघर्षयात्रेच्या माध्यमातून विरोधक सातत्यानं
सरकारवर कर्जमाफी करण्यासाठी दबाव टाकत आहेत. त्यामुळे विरोधकांवर टीका करताना दानवेंची ही अजब मागणी त्यांना महागात पडू शकते.