उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर असून कितने दूर.. कितने पास…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   तब्बल एक तपानंतर कट्टर विरोधक अशी ओळख असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एका व्यासपीठावर आले.   निमित्त ठरलं ते मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं. यावेळी स्टेजवर रश्मी ठाकरेसुद्धा उपस्थित होत्या.   दोघेही स्टेजवर एकत्र असले तरी दोघांमधील अंतर मात्र कायम होतं. नारायण राणे आणि उद्धव […]

उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर असून कितने दूर.. कितने पास…

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

तब्बल एक तपानंतर कट्टर विरोधक अशी ओळख असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एका व्यासपीठावर आले.

 

निमित्त ठरलं ते मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण भूमिपूजनाच्या कार्यक्रमाचं. यावेळी स्टेजवर रश्मी ठाकरेसुद्धा उपस्थित होत्या.

 

दोघेही स्टेजवर एकत्र असले तरी दोघांमधील अंतर मात्र कायम होतं. नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या मधील दोन खुर्चांवर केंद्रीय मंत्री आणि सेना नेते अनंत गीते

तसेच रश्मी ठाकरे विराजमान होत्या.

 

उद्धव ठाकरे आणि राणेंनी एकमेकांशी थेट संवाद जरी टाळला असला तरी कार्यक्रमात भाषण करताना नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचं स्वागत केले.

 

उद्धव ठाकरेंनीही माझे जुने सहकारी नारायणराव राणे असा उल्लेख करताच, टाळ्यांचा गजर पाहायला मिळाला. व्यासपीठावर कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेले उद्धव ठाकरे

आणि नारायण राणे मनाने आणि विचाराने कधी जवळ येतील या चर्चांनीही जोर धरला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number