उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात फक्त दोन खुर्च्यांचे अंतर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनासाठी एकाच व्यासपीठावर कट्टर विरोधक अशी ओळख असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते नारायण राणे एकत्र आले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यातलं अंतर काही कमी झालेलं नाही.   त्यामुळेच की काय या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरील आसनव्यवस्थेतही अंतर राखण्यात आले. व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या […]

उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यात फक्त दोन खुर्च्यांचे अंतर

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या भूमिपूजनासाठी एकाच व्यासपीठावर कट्टर विरोधक अशी ओळख असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेते

नारायण राणे एकत्र आले असले तरी प्रत्यक्षात मात्र त्यांच्यातलं अंतर काही कमी झालेलं नाही.

 

त्यामुळेच की काय या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरील आसनव्यवस्थेतही अंतर राखण्यात आले. व्यासपीठावर उद्धव ठाकरे आणि नारायण राणे या दोघांमध्ये तब्बल दोन

खुर्च्यांचं अंतर राखण्यात आले.

 

कार्यक्रमावेळी उद्धव-राणे या दोघांमध्ये अनंत गीते आणि चंद्रकांत पाटील यांची आसनव्यवस्था करण्यात आली आहे. कार्यक्रमानिमित्त एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि

नारायण राणे मनाने आणि विचाराने अद्यापही दूरच असल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा पाहायला मिळाले.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number