एकीकडे ३५० वा शिवराज्याभिषेक दिन अतिशय दिमाखदारपणे पार पडला. तर दुसरीकडे औरंगजेबाचं स्टेटस ठेवल्याने सर्वत्र चांगलाच वाद चिघळला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असून शरद पवारांनी यावर वक्तव्य केलं. तर, शरद पवारांवर निलेश राणेंनी खोचक टीका केली. याच टीकेनंतर अमोल मिटकरी यांनी देखील ट्विट करत निलेश राणेंना चांगलाच टोला लगावला आहे.
औरंगजेब प्रकरणी शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर निलेश राणे यांनी खोचक टीका केली. तर, त्यावर ‘पवारांवर बोलणारा भारतात जन्माला आला की नेपाळमध्ये?’ असे ट्विट करत अमोल मिटकरींनी निलेश राणेंवर चांगलाच हल्लाबोल केला आहे.
अमोल मिटकरींनी नेमकं काय ट्विट केलं?
‘…आणि हा पवार साहेबांबद्दल बोलतोय. तु नक्की भारतात जन्माला आला होता की नेपाळ ला? तुझा कदाचित हा तिसरा जन्म असावा पहिला नेपाळ दुसरा चिन आणि नंतर कोकणात. तु तर रंग बदलणाऱ्या सरड्यापेक्षाही भयंकर आहेस! तुला BJP ने तुकडा टाकलाय तो यासाठीच.#सरडा’ असं ट्विट करत अमोल मिटकरी यांनी निलेश राणेंना प्रत्युत्तर दिले आहे.
काय म्हणाले शरद पवार?
आपल्या देशात आणि राज्यात अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. अशात इतर प्रश्न उगाच समोर आणले जात आहेत. मर्यादित भागात तणाव झाला असेल तर चांगली गोष्ट आहे. मी ते म्हणत नाही. पण हे घडत नाही. औरंगाबादमध्ये औरंगजेबाचे फोटो दाखवल्यानंतर पुण्यात आणि कोल्हापुरात दंगल करण्याचे कारण काय? असा सवाल करतानाच फोटो दाखवला तर काय परिणाम होतो? अशा शब्दात शरद पवार यांनी फोटो झळकवणाऱ्यांचे कान टोचले. शरद पवार हे संभाजीनगर येथे पत्रकार परिषदेत बोलत होते.
निलेश राणेंनी नेमकं काय ट्विट केलं?
‘निवडणूक जवळ आली की पवार साहेब मुस्लिम समाजासाठी चिंताग्रस्त होतात, कधी कधी वाटतं औरंगजेबचा पुनर्जन्म म्हणजेच शरद पवार.’ असे ट्विट करीत निलेश राणे आणि शरद पवारांवर खोचक टीका केली.