जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सायकल चोर राणेंना शिवसेनेनं मुख्यमंत्री केले. नारायण राणेंना बाळासाहेबांनी मोठं केलं. मात्र तेच आज शिवसेना संपवायची भाषा करतात अशा शब्दात सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटलांनी राणेंवर टीका केलीय.
अहमदनगर येथे शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्या नागरी सत्कार कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.
शिवसेनेचा कार्यकर्ता हा अंगावर केस घेऊनच तयार होतो ज्याच्यावर केस झाली तो शिवसैनिक आमची पदवीच आहे बॅचलर ऑफ जेल याचा आम्हला अभिमान असल्याचे त्यांनी सांगितलं.