नारायण राणेंवर अन्याय होणार नाही – रावसाहेब दानवे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मंत्रिमंडळ विस्तार निश्चितच होणाराय. मात्र अद्याप त्याचा मुहूर्त ठरलेला नाही, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी नाशकात म्हणाले. विधान परिषद पोटनिवडणुकीबाबत बोलताना, आज रात्री उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असं त्यांनी सांगितलं. 2019च्या निवडणुकीची भाजपानं तयारी सुरू केली आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाचे 288 विस्तारक नियुक्त करण्यात आल्याची माहिती रावसाहेब […]

नारायण राणेंवर अन्याय होणार नाही – रावसाहेब दानवे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मंत्रिमंडळ विस्तार निश्चितच होणाराय. मात्र अद्याप त्याचा मुहूर्त ठरलेला नाही, असं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे रविवारी नाशकात म्हणाले.

विधान परिषद पोटनिवडणुकीबाबत बोलताना, आज रात्री उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होईल, असं त्यांनी सांगितलं.

2019च्या निवडणुकीची भाजपानं तयारी सुरू केली आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी पक्षाचे 288 विस्तारक नियुक्त करण्यात आल्याची माहिती रावसाहेब दानवेंनी दिली.

संघटनात्मक बांधणीसाठी विभागवार बैठका घेण्यात येणार असून या बैठकीतून आगामी निवडणुका जिंकण्याची रणनीती आखणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number