वृत्तसंस्था, मुंबई
रणबीर कपूर आपल्या मैत्रिणीला भेटायला लंडनला गेला होता, ही बातमी तुम्ही वाचलीच असेल. आता ही मैत्रिण कोण तर पाकिस्तानी अभिनेत्री माहिरा खान. माहिराला भेटण्यासाठीचं रणबीर लंडनला गेल्याची चर्चा काही दिवसांपूर्वी रंगली होती. कारण, माहिराही लंडनमध्ये होती. पण ही बातमी निव्वळ अफवा होती.
यामागचे खरे कारण आता समोर आले आहे. वृत्तांनुसार, ‘ब्रह्मास्त्र’ या आगामी चित्रपटासाठी रणबीर मार्शल आर्ट शिकतोय. याच्याच स्पेशल ट्रेनिंगसाठी रणबीर लंडनमध्ये गेला होता. या वृत्तानंतर रणबीरच्या नावे धरुन सुरु असलेल्या चर्चांना पूर्णविराम मिळालाय.