‘या’ श्रीमंत गणेशमूर्तीची किंमत माहीत आहे का?

जीएसबी गणपती हा मुंबईतला श्रीमंत गणपती मानला जातो. मात्र विदर्भातही असाच एक श्रीमंत गणपती आहे. बुलढाण्यातील खामगाव येथील ‘राणा गणेश मंडळा’च्या गणपतीची मूर्तीचीच किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे.   बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील दालफैल भागातील राणा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोने आणि चांदीने नटलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. गेल्या 20 वर्षापासून या गणेश मूर्तीवर […]

‘या’ श्रीमंत गणेशमूर्तीची किंमत माहीत आहे का?

जीएसबी गणपती हा मुंबईतला श्रीमंत गणपती मानला जातो. मात्र विदर्भातही असाच एक श्रीमंत गणपती आहे. बुलढाण्यातील खामगाव येथील ‘राणा गणेश मंडळा’च्या गणपतीची मूर्तीचीच किंमत तब्बल 80 लाख रुपये आहे.

 

बुलढाणा जिल्ह्याच्या खामगाव तालुक्यातील दालफैल भागातील राणा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सोने आणि चांदीने नटलेल्या गणेश मूर्तीची स्थापना केली आहे. गेल्या 20 वर्षापासून या गणेश मूर्तीवर दरवर्षी सोने आणि चांदीच्या अभूषणात वाढ करण्यात येतेय. याही वर्षी या गणेश मूर्तीवर 10 किलो चांदीची आभूषणं चढवण्यात आली आहेत. यावर्षी या गणेश मूर्तीवर तब्बल 70 किलो चांदी आणि 2 किलोच्या वर सोन्याचे अलंकार चढवले आहेत. यामध्ये सोनाच्या हार, कानातील कुंडलं, गणेशाचं आसन तसंच उंदीर यांचा समावेश आहे.

 

 

हे सर्व अलंकार मंडळाचे कार्यकर्ते स्वखर्चातून चढवत असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षांनी दिली आहे. या मूर्तीच्या सुरक्षेसाठी मंडळाकडून मंडळ परिसरात मोठ्या प्रमाणात CCTV लावण्यात आले आहेत.

 

 

या मूर्तीचं विसर्जन कसं होत असेल, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर विसर्जन मिरवणुकीत हे लक्षाधीश गणराज सामील होतात खरे, पण या गणरायांचे विसर्जन मात्र करण्यात येत नाही.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number