आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसाचे पठण करणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यानुसार आज राणा दाम्पत्य विमानाने मुंबईत दाखल झाल आहेत. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याच्या निर्णयावर ठाम असून राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाले आहेत.
आमदार रवी राणा यांनी मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे राणा दाम्पत्य यांच्या या निर्णयामुळे शिवसैनिक आक्रमक झाले आहे. दरम्यान, आज राणा दाम्पत्य मुंबईत दाखल झाल्यामुळे मातोश्रीबाहेर शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली आहे. तसेच पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
हनुमान जयंतीच्या दिवशी आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्यांना आहन केले होते की, ‘राज्यात जेव्हापासून मुख्यमंत्री झाले आहेत तेव्हापासून महाराष्ट्राला ग्रहण लागले आहे. त्यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या श्रद्धास्थान असलेल्या मातोश्री या निवासस्थानी हनुमान चालीसा पठण करा. मात्र, हनुमान जयंतीच्या शुभ पर्वावर त्यांनी हे पठण केले नाही. त्यामुळे मातोश्रीसमोर हनुमान चालिस वाचू. ज्याप्रमाणे वारी शांततेत निघते, त्याप्रमाणे आम्ही शांततेत हे पठण करणार आहोत. कोणताही गोंधळ होणार नाही. शांततापूर्वक आम्ही हनुमान चालीसा वाचून राज्याच्या शांतीसाठी प्रार्थना करू.’
रवी राणा यांनी मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठण करणार असल्याचे सांगितल्यावर शिवसैनिक आक्रमक झाले. तसेच मुंबईला जाऊनच दाखवा, असे आव्हान शिवसैनिकांनी राणा दाम्पत्यांना दिले होते. मात्र, राणा दाम्पत्यांनी शिवसैनिकांना चकमा देत विमानाने प्रवास करत मुंबईत दाखल झाले आहेत.