वृत्तसंस्था, मुंबई
बाबा राम रहिमला सीबीआयच्या विशेष न्यायालयाने बलात्काराप्रकरणी दोषी ठरवलं त्यानंतर बाबा राम रहिमच्या संबंधित धक्कादायक माहिती समोर येऊ लागल्या आहेत.
बाबाचं मुंबई कनेक्शन आता समोर आले आहे. नुकताच, बाबा राम रहिमचा मुंबईत भाड्याने एक फ्लॅट असल्याची माहिती समोर आली. मुंबईतील वांद्रा परिसरातील प्लेटेनियम इमारतीत हा फ्लॅट आहे.
या फ्लॅटमध्ये बाबा राम रहिम भाड्याने राहत होते. या इमारतीच्या दुसऱ्या, अकराव्या आणि बाराव्या मजल्यावर बाबा राम रहिमचे फ्लॅट होते. यावेळी त्यांच्यासोबत गर्लफ्रेंड असायची. मुंबईत फिरण्यासाठी त्याने खास हरियाणावरून एक अलिशान कार सुद्धा आणली होती.