जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
एनडीएचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार रामनाथ कोविंद हे 15 जुलैला मुंबई दौऱ्यावर येणार आहेत.
मात्र, रामनाथ कोविंद हे ‘मातोश्री’वर जाणार नाहीत. त्यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात ‘मातोश्री भेटी’चा उल्लेख नाही.
भाजपप्रणित एनडीएने बिहारचे माजी राज्यपाल रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून घोषणा केली.
त्यानंतर एनडीएमधील सर्वच पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला. मात्र, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती.
याच सर्व पार्श्वभूमीवर रामनाथ कोविंद हे मुंबईत येत असल्याने ते ‘मातोश्री’वर जातील का, याबाबत चर्चा सुरु होत्या.
मात्र, कोविंद यांच्या दौऱ्याच्या वेळापत्रकात कुठेही ‘मातोश्री भेटी’चा उल्लेख नाही. त्यामुळे ते मातोश्रीवर जाणार नसल्याचे स्पष्ट झाले.
मुंबईत आल्यावर विमानतळावरुन ते थेट मरीन ड्राईव्हच्या गरवारे क्लबमध्ये जातील. तिथे भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी आणि एनडीएमधील घटकपक्षांशी संवाद
साधतील.