जय महाराष्ट्र न्यूज, नागपुर
नागपुरात जुगार खेळताना काँग्रेस नगरसेवकाला अटक करण्यात आलीय. रमेश पुणेकर हा वॉर्ड क्र 20 चा नगरसेवक आहे.
नागपुरातच त्याला 20 व्यापाऱ्यांसह जुगार खेळताना रंगेहाथ अटक करण्यात आली. यावेळी 20 व्यापाऱ्यांनाही पोलिसांनी बेडया ठोकल्यायंत.
अशा प्रकारे नगरसेवकच जुगार खेळ्यात गुंतले असतील तर सामान्य नागरिकांपुढे आदर्श कोणाचा राहाणार असा सवाल नागरिकांपुढे उपस्थित झालाय.