नाशिक महापालिकेचे आयुक्त कैलास जाधव यांना पदावरून हटवण्यात आल्यानंतर नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी रमेश पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे नवनियुक्त आयुक्त रमेश पवार यांनी स्विकारली आहेत.
प्रशासकीय राजवट असताना नवनियुक्त आयुक्त रमेश पवार यांनी नाशिक महापालिका आयुक्तपदाचा कार्यभार स्विकारला आहे. तसेच आयुक्त रमेश पवार हे मातोश्रीच्या जवळचे असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
नाशिक पालिकेचे नवनियुक्त आयुक्त रमेश पवार यांच्यासमोर अनेक आव्हाने आहेत. आर्थिक संकटात सापडलेल्या महापालिकेला आर्थिक संकटातून मुक्त करण्याचे महत्त्वाचे आव्हान रमेश पवार यांच्यासमोर आहे. तसेच महापालिकेतील इतर अडचणी दूर करून कारभार सुरळीत करण्याचेही आव्हान रमेश पवार यांच्याकडे आहे.
एक एकरहून अधिक क्षेत्रावरील बांधकामातील वीस टक्के बांधकाम आर्थिक दुर्बल घटकांसाठी म्हाडाला वर्ग करण्याचा नियम आहे. मात्र, महापालिकेने त्याचे उल्लंघन केले. तसेच यासंबंधी म्हाडाने लिहिलेल्या पत्रांना उत्तर दिले नाही. त्यानंतर विधान परिषदेचे सभापती निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली पालिका आयुक्त कैलास जाधव यांना पदावरून हटवण्यात आले. त्यामुळे घरकुल घोटाळा जाधवांना भोवला का? असा सवाल उपस्थित होत आहे.