जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अण्णाभाऊ साठे महामंडळातील घोटाळ्याप्रकरणी सध्या कारागृहात असलेला राष्ट्रवादी कॉँग्रेसचा आमदार रमेश कदम याने एका पोलीस अधिकाऱ्याला एकेरी व अत्यंत अर्वाच्च शब्दात अश्लील शिवीगाळ करण्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी सकाळी भायखळा कारागृहात घडला.
जेजे रुग्णालयात ओपीडीकरता नेत असताना घोटाळेबाज रमेश कदम बंदोबस्तावर असलेले सहाय्यक निरीक्षक मनोज पवारांना सतत शिवीगाळ करत होता.
केवळ एवढ्यावरच न थांबता पवारांवर दबाव आणण्याकरता कदमने आपल्या कार्यकर्त्याला अप्पर आयुक्तांकडे लाच मागितल्याची तक्रार करण्यास सांगितले.
तसंच विधानसभेत हक्कभंग आणण्याची धमकीसुद्धा दिली. रमेश कदम पोलिसाला शिवीगाळ करत धमकी देत असल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.