तुरुंगात आमदार रमेश कदमांच्या टोळक्या माजवतायत दहशत !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   आमदार रमेश कदम यांचे कारागृहात टोळकं असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रमेश कदम यांचे हे टोळके कारागृहात दहशत माजवत असल्याचे देखील समोर आले आहे. महानगरदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.   उच्च न्यायालयाने महानगरदंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाची गंभीर दखल घेतली आहे. सरकारच्या कारवाई न करण्याच्या भूमिकेवर न्यायालयाने […]

तुरुंगात आमदार रमेश कदमांच्या टोळक्या माजवतायत दहशत !

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

आमदार रमेश कदम यांचे कारागृहात टोळकं असल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. रमेश कदम यांचे हे टोळके कारागृहात दहशत माजवत असल्याचे देखील समोर आले आहे. महानगरदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

 

उच्च न्यायालयाने महानगरदंडाधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालाची गंभीर दखल घेतली आहे. सरकारच्या कारवाई न करण्याच्या भूमिकेवर न्यायालयाने प्रश्नचिन्ह  उपस्थित केले आहे.

”कच्च्या कैद्यांसोबत ठेवण्यात आलेल्या कदम यांच्याकडून जेलमध्ये गटबाजी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ते त्यांना चिथावणी देण्याचे काम करत असल्याने हे तुरुंगाच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक आहे’’, असे अहवालात नमूद केले आहे.

 

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे आमदार रमेश कदम हे सध्या ऑर्थर रोड तुरुंगात आहेत. ऑगस्ट 2015 मध्ये अण्णाभाऊ साठे गैरव्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number