जय महाराष्ट्र न्यूज, कल्याण
केंद्र सरकारला 3 वर्ष पूर्ण झाल्याने ठाण्यात एक पत्रकार परिषद आयोजीत करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत रिपाईचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री रामदास
आठवले यांनी शेतकऱी कर्जमाफीवरुन सर्वच पक्षांना सल्ला दिला.
कर्जमाफीसाठी गेल्या आठवड्यापासून सुरु असलेलं आंदोलन थांबवून मुख्यमंत्र्याशी संवाद साधण्याचं आवाहन रामदास आठवले यांनी शेतकऱ्यांना केले.
कर्जमाफीच्या आंदोलनाला पाठींबा असल्याचेही ते म्हणाले. तर,शिवसेना आणि राष्ट्रवादीलाही राजकारण न करता एकत्र येउन चर्चा करण्याचा सल्ला ही त्यांनी दिला.
राष्ट्रवादीने शेतकऱ्यांच्या आंदोलनात फूट न पाडता चर्चा करावी तर, सेनेही आंदोलनाची भूमिका सोडावी असं ते म्हणालेत. तर, मध्यावधी निवडणूका होणार नसून
कोणत्याही आमदाराला निवडणूक नको असल्याचेही ते म्हणाले.