चंद्रकांत खैरेंविरोधात शेरेबाजी रामदास कदमांना भारी पडली; थेट मातोश्रीवरुन घेण्यात आला मोठा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद   औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेला वाद पर्यावरण मंत्री रामदास कदमांना चांगलाच भोवला आहे. कारण, रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीये. रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. 15 जानेवारीला औरंगाबादेत रामदास कदम यांनी चंद्रकांत खैरेंविरोधात शेरेबाजी केली होती. हा वाद थेट ‘मातोश्री’वर […]

चंद्रकांत खैरेंविरोधात शेरेबाजी रामदास कदमांना भारी पडली; थेट मातोश्रीवरुन घेण्यात आला मोठा निर्णय

जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद

 

औरंगाबादचे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरे यांच्याशी झालेला वाद पर्यावरण मंत्री रामदास कदमांना चांगलाच भोवला आहे. कारण, रामदास कदमांची औरंगाबादच्या पालकमंत्रिपदावरून उचलबांगडी करण्यात आलीये.

रामदास कदमांच्या जागी डॉ. दीपक सावंत यांच्याकडे औरंगाबादचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं आहे. 15 जानेवारीला औरंगाबादेत रामदास कदम यांनी चंद्रकांत खैरेंविरोधात शेरेबाजी केली होती.

हा वाद थेट ‘मातोश्री’वर धडकल्यानंतर रामदास कदमांकडून औरंगाबादचं पालकमंत्रिपद काढून घेण्यात आलं. दरम्यान, रामदास कदमांकडे नांदेडचं पालकमंत्री सोपवण्यात आलं आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number