जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
अंगारकी चतुर्थीनिमित्त मुंबईचं सिद्धीविनायक मंदिर गजबजून गेले आहे.
सिद्धिविनायक मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. त्यासोबत भाविकांना सुलभ दर्शन व्हावं यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान शिवसेना नेते रामदास कदमांनी सुद्धा सिद्धिविनायकाचं दर्शन घेतले. बाप्पाने सरकारला सुबुद्धी दिली अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.