ट्रॅफिकजामच्या वाढत्या समस्या; मुंबईकरांसह मंत्रीसुद्धा त्रस्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई सध्या मेट्रो प्रकल्पासाठी सर्वत्र खोदकामामुळे ट्रॅफिकची समस्या खूप भेडसावू लागली आहे. ‘मुंबईतल्या ट्रॅफिक जामने सर्वसामान्य मुंबईकरच नाही तर मंत्री देखील त्रस्त झाले आहेत. त्यात लोकल प्रवास कधीही उत्तमच. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रो 3 प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे नरिमन पॉईंट ते बोरीवली या प्रवासाला तीन ते चार तास लागतात. त्यामुळे आता […]

ट्रॅफिकजामच्या वाढत्या समस्या; मुंबईकरांसह मंत्रीसुद्धा त्रस्त

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

सध्या मेट्रो प्रकल्पासाठी सर्वत्र खोदकामामुळे ट्रॅफिकची समस्या खूप भेडसावू लागली आहे. ‘मुंबईतल्या ट्रॅफिक जामने सर्वसामान्य मुंबईकरच नाही तर मंत्री देखील त्रस्त झाले आहेत. त्यात लोकल प्रवास कधीही उत्तमच.

वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मेट्रो 3 प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम सुरू आहे. त्यामुळे नरिमन पॉईंट ते बोरीवली या प्रवासाला तीन ते चार तास लागतात. त्यामुळे आता राज्याचे मंत्री देखिल लोकलने प्रवास करू लागलेत.

अधिवेशनच्या पहिल्याच दिवशी राज्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम दिवसभराचं कामकाज बैठका संपल्यावर कांदिवली येथील घरी जाण्यासाठी थेट चर्चगेट वरून लोकल पकडली.

संध्याकाळी प्रवाशांच्या गर्दीतच रामदास कदम यांचा सर्वसामान्य मुंबईकरांसारखा प्रवास झाला. त्यांचा हा प्रवास इतर प्रवासीदेखील कुतूहलाने पाहत होते.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number