जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबईत 50 ठिकाणी आणि राज्यातील पाच महानगरपालिका क्षेत्रात प्रदूषणाला आळा घालण्यासाठी प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणार असल्याचे पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सांगितलंय. ते शुक्रवारी मंत्रालयात स्ट्राटा इनव्हिरो कंपनीतर्फे प्रदूषण नियंत्रण यंत्रणेसंदर्भातील सादरीकरण बैठकीत बोलत होते.
धूर आणि धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत आहे. प्रदूषण कमी करायचे असेल तर प्रदूषण नियंत्रण यंत्रणा बसविणे गरजेचे आहे, असं ही ते म्हणालेत.