Homeमहाराष्ट्र कापडी पिशव्यांसाठी मनपाला 5 कोटी देणार ; रामदास कदमांची घोषणा
कापडी पिशव्यांसाठी मनपाला 5 कोटी देणार ; रामदास कदमांची घोषणा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई प्लास्टिक बंदीच्या अंमलबजावणीत नागरिकांना अडचणीला तोंड द्यावे लागू नये यासाठी मोठ्या प्रमाणात कापडी पिशव्या बाजारात आणण्याची कार्यवाही सुरू आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेला यासाठी 5 कोटी रुपये निधी देण्यात येईल, असे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी विधानसभेत सांगितले.