जय महाराष्ट्र न्यूज, अकोला
बाहेर पावटा पिण्यापेक्षा तरूणांनी लष्करात जावून औषध म्हणून रम-ब्रँडी प्यावी, असं वादग्रस्त विधान केलंय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.
ते अकोला येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींना एक महत्वाचा सल्ला देखील दिला.
दलितांच्या घरी जाणाऱ्या राहूल गांधींनी दलित मुलीशी लग्न करण्याचं आवाहन आठवलेंनी यावेळी केले. त्यासाठी आम्हाला त्यांनी सांगितल्यास त्यांना स्थळ शोधायला मदत करू, असंही ते म्हणालेत.
संजय राऊतांच्या राहूल गांधींसंदर्भातील वक्तव्यावरही आठवले यांनी भाष्य केलंय. राहूल आता पप्पूही राहीले नाहीत अन अप्पूही राहीले नाहीत. ते पक्षासाठी अधिक मेहनत घेत असल्याचे रामदास आठवले म्हणाले.