जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राष्ट्रपतीच्या निवडणुकीत काँग्रेसने मीरा कुमार यांना ऊभ करुन बळीचा बकरा केलाय असा टोला सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवलेंनी लगावला आहे. अहमदनगर येथे ते बोलत होते.
काँग्रेसच्या मीरा कुमार यांच्या पेक्षा जास्त मतं कोविंद यांना मिळतील आणि कोविंद हेच राष्ट्रपती होतील असा विश्वासही सामदास आठवले यांनी व्यक्त केला.
राज्यातील राजकीय परस्थितीवर बोलताना रामदास आठवले म्हणाले की उद्धव ठाकरे यांनी कर्जमाफीचे श्रेय घ्यावे, पण सरकारचा पाठिंबा काढू नये. मात्र, पाठिंबा काढला
तरी केंद्र व राज्य सरकार पडणार नाही असा टोला ही त्यांनी शिवसेनेला लगावला.