जय महाराष्ट्र न्यूज, शिर्डी
साई बाबांच्या जन्मस्थळावरून खुद्द महामहीम राष्ट्रपती यांनी केलेल्या एका वक्तव्यावरूनच वाद निर्माण झालाय. त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद शिर्डीत पाहायाला मिळालंय.
गेल्या 1 ऑक्टोबरला साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्याच्या उद्धाटनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आले होते. यावेळी केलेल्या भाषणात कोविंद यांनी, ‘साईबाबांचे जन्मस्थान परभणी जिल्ह्यातील पाथरी असल्याची भावना अनेक भाविकांचीये.
त्यामुळे राज्य सरकारने पाथरीच्या विकासासाठी प्रयत्न करावेत, असे म्हटलंय. राष्ट्रपती कोविंद यांच्या या वक्तव्यामुळे शिर्डीतील साईभक्तांनी नाराजी व्यक्त करत आक्षेप घेत, साईबाबा संस्थानने याबाबत अधिकृत खुलासा करावा…. अशी मागणी लावून धरली होती. यासंदर्भात आपण लवकरच राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचे स्पष्टीकरण संस्थानचे अध्यक्ष हावरे यांनी बैठकीत दिले आहे.