अन् घाटकोपरमध्ये आणखी एक भयंकर इमारत दुर्घटना होता होता टळली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबईच्या घाटकोपरमध्ये साईदर्शन इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली आहे. घाटकोपर पूर्व भागातील रायगड चौकामध्ये असलेली डॉ. रामदी सदन इमारत एका बाजूला झुकली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले.   तळमजला अधिक दोन मजले अशी या इमारतीची रचना आहे. इमारत 60 वर्षांपेक्षा जुनी असल्याने मालक आणि […]

अन् घाटकोपरमध्ये आणखी एक भयंकर इमारत दुर्घटना होता होता टळली

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबईच्या घाटकोपरमध्ये साईदर्शन इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होता होता टळली आहे. घाटकोपर पूर्व भागातील रायगड चौकामध्ये असलेली डॉ. रामदी

सदन इमारत एका बाजूला झुकली होती. वेळीच हा प्रकार लक्षात आल्याने तेथील रहिवाशांना बाहेर काढण्यात आले.

 

तळमजला अधिक दोन मजले अशी या इमारतीची रचना आहे. इमारत 60 वर्षांपेक्षा जुनी असल्याने मालक आणि भाडेकरुंच्या वादातून इमारतीचा

पुनर्विकास रखडला होता. बुधवारी संध्याकाळी इमारत झुकल्याचे नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना याची माहिती दिली.

इमारत एका बाजूला झुकल्यानं इमारतीतील 33 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं. घटनास्थळी पोलिस प्रशासनाने बंदोबस्त लावला असून

धोकादायक बांधकाम तोडण्याचे काम पालिकेने सुरु केल आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number