वृत्तसंस्था, नवी दिल्ली
डेरा सच्चा सौदा पंथाचे प्रमुख गुरमित राम रहिम सिंग याला न्यायालयाने बलात्कार प्रकरणात दोषी ठरवले आहे. बाबा राम रहीमला दोषी ठरवल्यानंतर त्याला काय शिक्षा सुनावणार याकडे
सर्वांचेच लक्ष लागून होते.
या पार्श्वभूमीवर सोमवारी दुपारी रोहतक जेलमध्ये झालेल्या सुनावणीत बाबा रहीमला 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. बाबा राम रहीमला दोन्ही शिक्षा वेगवेगळ्या भोगाव्या
लागणार आहेत. दोन साध्वींच्या बलात्कारप्रकरणी राम रहीमला प्रत्येकी 10 वर्षांची शिक्षा झाली असून दोन्ही प्रकरणात 15-15 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. याप्रकरणी न्यायाधीश जगदीप सिंह यांनी राम रहिमला शिक्षा सुनावली आहे.
तसेच राम रहिमचा हा पहिला गुन्हा असल्याचं सांगून त्याला कमीत कमी शिक्षा व्हावी अशी मागणी रहिमच्या वकिलांनी केली.