Lord Ram Statue: हुबेहूब रामलल्ला; वजन पाच क्विंटल अन् किंमत 25 कोटी; अयोध्येतील नव्या मूर्तीचे काय आहे वैशिष्ट्य?

प्रतिष्ठा द्वादशी निमित्त अंगद टीला येथे मूर्तीची स्थापना होण्याची शक्यता असून भव्य धार्मिक सोहळ्यांची तयारी सुरू आहे.

Lord Ram Statue: हुबेहूब रामलल्ला; वजन पाच क्विंटल अन् किंमत 25 कोटी; अयोध्येतील नव्या मूर्तीचे काय आहे वैशिष्ट्य?

अयोध्येतील राम मंदिर (Ram Mandir) परिसरात आता रामलल्लांची एक विशेष आणि दुर्मिळ प्रतिमा विराजमान होणार आहे. 10 फूट उंच आणि आठ फूट रुंद असलेली ही भव्य मूर्ती कर्नाटक (Karnataka) येथून मंगळवार, 23 डिसेंबर 2025 रोजी अयोध्येत दाखल झाली. सुमारे 1,750 किलोमीटरचा प्रवास एका विशेष वाहनाद्वारे पाच ते सहा दिवसांत पूर्ण करून ही मूर्ती रामजन्मभूमी परिसरात आणण्यात आली आहे.

या मूर्तीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे तिची झळाळी आणि त्यावर जडलेली मौल्यवान रत्ने. सोन्यासारखी चमक असलेल्या या प्रतिमेमध्ये हिरे (Diamonds), पाचू (Emeralds) आणि इतर अनेक मौल्यवान खडे जडवण्यात आले आहेत. तंजावरच्या (Thanjavur) अनुभवी कारागिरांनी दक्षिण भारतीय शिल्पकला शैलीत ही मूर्ती साकारली आहे. अंदाजे पाच क्विंटल (500 किलो) वजनाच्या या मूर्तीची किंमत 25 ते 30 कोटी रुपयांच्या दरम्यान असल्याचे सांगितले जात आहे.

हेही वाचा: 8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर! आठव्या वेतन आयोगाची तयारी अंतिम टप्प्यात; पगारात किती वाढ होणार?

ही प्रतिमा राम मंदिरात सध्या असलेल्या मूळ रामलल्लांच्या मूर्तीची हुबेहूब प्रतिकृती आहे. श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे सदस्य डॉ. अनिल मिश्र यांनी माहिती दिली की, ही मूर्ती संत तुलसीदास मंदिराजवळ असलेल्या ‘अंगद टीला’ (Angad Tila) येथे स्थापित करण्यावर विचार सुरू आहे. या मूर्तीची स्थापना करण्यापूर्वी तिचे भव्य अनावरण केले जाईल आणि त्यानंतर देशभरातील संतांच्या उपस्थितीत प्राण-प्रतिष्ठा सोहळा पार पडेल.

योगायोगाने, रामलल्लांच्या प्राण-प्रतिष्ठेचा दुसरा वर्धापन दिन (Second Anniversary) साजरा करण्यासाठी अयोध्येत 29 डिसेंबर 2025 ते 2 जानेवारी 2026 या कालावधीत विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला ‘प्रतिष्ठा द्वादशी’ (Pratishtha Dwadashi) असे म्हटले जात असून, 31 डिसेंबर 2025 रोजी याचा मुख्य सोहळा पार पडणार आहे. अंगद टीला परिसरात या कार्यक्रमासाठी भव्य मंडप आणि सजावटीचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे.

या पाच दिवसीय उत्सवादरम्यान राम अभिषेक, विशेष शृंगार, छप्पन भोग आणि प्राकट्य आरती यांसारखे धार्मिक विधी संपन्न होतील. कर्नाटकच्या भक्तांनी दिलेली ही मौल्यवान भेट राम मंदिराच्या आध्यात्मिक आणि सांस्कृतिक वैभवात आणखी भर घालणार आहे.

हेही वाचा: Viraansh Bhanushali speech in Oxford Union : ऑक्सफर्ड विद्यापीठात दणदणीत भाषण; मुंबईतील विद्यार्थ्यानं पाकिस्तानला उघडं पाडलं

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number