वृत्तसंस्था, मुंबई
राम गोपाल वर्मा आणि वाद हे एक जुनं नातं आहे असं म्हणायला हरकत नाही. आता राम गोपाल वर्माचा पुन्हा एक नवीन वाद समोर येतोय.
रामुने त्याच्या नवीन ‘ गॉड सेक्स अँड ट्रूथ’ या चित्रपटात पॉर्न स्टारला घेतल्याने आधीच तो वादाच्या भोवर्यात सापडला असताना एका महिलेने त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार दिलीय.
एका तेलगू वाहिनीच्या कार्यक्रमात संबंधित महिला कार्यक्रत्याने राम गोपाल वर्मा यांना प्रश्न विचारला होता की चित्रपटात पॉर्न स्टारला घेवून तुम्हाला समाजाला कोणता संदेश द्यायचा आहे यावर राम गोपाल वर्माने आक्षेपार्ह उत्तर दिल्याने महिलेने राम गोपाल वर्मा विरोधात पोलिसात तक्रार दिलीय.