सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयाविरोधात डोंबिवलीत रॅली!

वय वर्ष 10 ते  50 वर्षाच्या महिलांना मंदिरात जाण्यास मज्जाव होता मात्र कोर्टाच्या निर्णयाने महिलांना प्रवेश मिळणार आहे. मात्र तरीही या परंपरेला झुगारून न देता तिचं पालनच करण्याच्या उद्देशाने आज डोंबिवली शहरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं. आम्ही आमच्या परंपरा मोडणार नाही 10 वर्षापर्यंत आणि 50 वर्षानंतरच आम्ही मंदिरात जाऊ, असं मत येथील महिला आणि कार्यकर्त्यांनी […]

सुप्रीम कोर्टाच्या ‘या’ निर्णयाविरोधात डोंबिवलीत रॅली!

वय वर्ष 10 ते  50 वर्षाच्या महिलांना मंदिरात जाण्यास मज्जाव होता मात्र कोर्टाच्या निर्णयाने महिलांना प्रवेश मिळणार आहे. मात्र तरीही या परंपरेला झुगारून न देता तिचं पालनच करण्याच्या उद्देशाने आज डोंबिवली शहरात रॅलीचं आयोजन करण्यात आलं.

आम्ही आमच्या परंपरा मोडणार नाही 10 वर्षापर्यंत आणि 50 वर्षानंतरच आम्ही मंदिरात जाऊ, असं मत येथील महिला आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केलंय सरकारने आमच्या भावनांचा पुनर्विचार करावा अशी ही मागणी त्यांच्या वतीने करण्यात आली.

हिंदू महासंघम आणि भारतीय जनता पार्टी साऊथ इंडियन सेल अंतर्गत आज  सकाळी 9 वाजता डोंबिवली पश्चिम अंबाभवानी मंदिरापासून ते डोंबिवली पूर्व राजाजी पंथ येथील अयप्पा मंदिरापर्यंत एक मोठी रॅली मल्याळी समाजाच्या वतीने काढण्यात आली. या रॅलीत शेकडो महिला  तसंच पुरूष सहभागी झाले होते. सुमारे 3200 जणांचा मोर्चा डोंबिवली-ठाकुर्ली परिसरातील नागरिकांनी काढला होता.

“शबरीमाला मंदिरासंदर्भात सुप्रीम कोर्टाचा आम्ही आदर करतो पण  कोर्टाने जो निर्णय दिलाय  तो आम्हा महिलांना मान्य नाही, कारण ही आमची परंपरा आहे  शबरीमला मंदिरात न जाताही धर्माचं पालन करता येईल.”

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number