जय महाराष्ट्र न्युज, मराठवाडा
नरेंद्र मोदी सरकारला केंद्रात येऊन जवळपास 4 वर्षे पूर्ण झालेली आहेत. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत मित्रपक्ष असलेला स्वाभिमानी शेतकरी संघटना मात्र येत्या निवडणुकीत भाजप सोबत जाणार नाही.
मराठवाड्याच्या दौऱ्यावर असताना राजू शेट्टी यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भाजपने जशी फसवी आश्वासन दिली तशी दुसरी कोणी देत नसतील तर शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कोणासोबतही जायला तयार आहोत, पण भाजप सोबत जाणार नाही अशी भूमिका राजू शेट्टी यांनी घेतली आहे.