Homeमहाराष्ट्र अडवाल, तिथेच ठिय्या आंदोलन सुरू करू राजू शेट्टींचा इशारा
अडवाल, तिथेच ठिय्या आंदोलन सुरू करू- राजू शेट्टींचा इशारा
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत 22 मेपासून सुरू झालेली राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा सोमवारी मंत्रालयावर धडकण्यासाठी दक्षिण मुंबईत दाखल झाली. सरकारने शेतकऱ्यांना अडवल्यास ‘अडवाल, तिथेच ठिय्या आंदोलन सुरू करू,’ असा इशारा शेट्टी यांनी दिला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ऊन सोसत नसल्याने ते यात्रेत सहभागी न झाल्याचा […]
केंद्र व राज्य सरकारचे धोरण शेतकरीविरोधी असल्याचे सांगत 22 मेपासून सुरू झालेली राजू शेट्टींची आत्मक्लेश यात्रा सोमवारी मंत्रालयावर धडकण्यासाठी दक्षिण मुंबईत दाखल झाली.
सरकारने शेतकऱ्यांना अडवल्यास ‘अडवाल, तिथेच ठिय्या आंदोलन सुरू करू,’ असा इशारा शेट्टी यांनी दिला. राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना ऊन सोसत नसल्याने ते यात्रेत सहभागी न झाल्याचा टोलाही शेट्टी यांनी लगावला.