जय महाराष्ट्र न्यूज, बारामती
केंद्र सरकार परदेशातून साखर आयात करण्याच्या विचाराधीन आहे. पण, परदेशातील साखर आयात केली तर ऊस उत्पादकांना याचा फटका बसेल असे खासदार राजू शेट्टीं यांनी म्हटलंय.
साखार आयात करायची झाली तर त्याचा आयातकर कमी करावा लागेल असा सल्लाही राजू शेट्टींनी दिलाय. साखर आयात झाली तर साखरेचे भाव पडतील असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.
जर, सरकारने साखर आयात करण्याचा निर्णय घेतला तर आम्ही रस्त्यावर उतरू असा इशारा राजू शेट्टींनी दिला आहे.