जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
सदाभाऊ खोत म्हणजे शेतकरी संघटना नाही. तर, सदाभाऊ स्वाभिमानी संघटनेचे एक घटक असल्याचं राजू शेट्टींनी स्पष्ट केले.
मंत्रीमंडळात सदाभाऊंना खूपच कमी अधिकार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर अवलंबून नाही.
शेतकरी कर्जमाफी, तूर खरेदी प्रश्नावर आम्ही सरकारशी रस्त्यावर उतरून लढू असा इशाराही त्यांनी दिला.
तर, उद्धव ठाकरेंसोबत झालेली बैठक ही समृद्धी महामार्गासंदर्भात झाली असंही राजू शेट्टींनी स्पष्ट केले.