स्वाभिमानी शेतकरी संघटना आज मुख्यमंत्र्यांना भेटून सत्तेतून बाहेर पडण्याचे पत्र देणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आदी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सरकारसोबत मतभेद वाढले होते.   सरकारच्या कामावर नाखूश असणाऱ्या राजू शेट्टींनी काही दिवसांपूर्वी एनडीएतून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली होती.   या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आज एनडीएतून बाहेर पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांना वर्षा निवास्थानी भेटून सत्तेतून बाहेर पडण्याचे पत्र […]

स्वाभिमानी शेतकरी संघटना आज मुख्यमंत्र्यांना भेटून सत्तेतून बाहेर पडण्याचे पत्र देणार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शेतकरी कर्जमाफी, हमीभाव, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी आदी मुद्द्यांवरुन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं सरकारसोबत मतभेद वाढले होते.

 

सरकारच्या कामावर नाखूश असणाऱ्या राजू शेट्टींनी काही दिवसांपूर्वी एनडीएतून बाहेर पडणार असल्याची घोषणा केली होती.

 

या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटना आज एनडीएतून बाहेर पडणार आहेत. मुख्यमंत्र्यांना वर्षा निवास्थानी भेटून सत्तेतून बाहेर पडण्याचे पत्र स्वाभिमानी शेतकरी

संघटना देणार असल्याची माहिती समोर येत आहे.

 

तसेच स्वाभिमानीच्या कोट्यातलं वस्त्रोद्योग महामंडळाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number