जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महसूलमंत्री चंद्रकांत पाटलांनी दिलेली ऑफर स्वाभीमानी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी फेटाळली आहे.
आमच्या पक्षाला राज्य आणि केंद्र स्तरावर शेतकऱ्यांची संघटना मजबूत करायची असल्यानं सत्तेत राहणे अडचणीचे आहे. त्यामुळे सत्तेचे पद स्वीकारण्याचा प्रश्नच
उद्भवत नाही असा टोला खासदार राजू शेट्टींनी चंद्रकांत पाटलांना लगावला.
खासदार राजू शेट्टी यांच्या पक्षाला अन्य एक मंत्रिपद देण्यास तयार असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. तसेच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रविकांत तुपकर यांचा
राजीनामा मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्वीकारला नाही अशी माहिती महसूल मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली.