जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यातील युती सरकारमधून बाहेर पडलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी येथे भेट घेतलीये.
अशोक चव्हाण यांनी खासदार शेट्टी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतलीये. दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येतेय.
मात्र, कोणत्या राजकीय मुद्यावर चर्चा झाली, याचा तपशील मिळू शकलेला नाही. या भेटी वेळी माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, प्रकाश आवाडे, गणपतराव पाटील, पृथ्वीराज साठे, तौफिक मुल्लाणी, अनिल मादनाईक, भगवान काटे आदी नेतेही उपस्थित होते.