जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
1 जूनपासून शेतकरी संपावर जाणार असल्याने सरकार धास्तावल आहे. त्यामुळे संप मिटवण्यासाठी शेतकऱ्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरु केले आहेत.
त्यासाठी शेतकऱ्यांकरीता आत्मक्लेश यात्रा करणाऱ्या राजु शट्टींना डावलून सदाभाऊ खोत यांना चर्चेसाठी पुढाकार देण्यात आला.
शेतकरी चर्चेसाठी मंत्रालयात येत नसल्याचं दिसल्यानं अखेर आज कृषी राज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पुणतांबा गाठून शेतकऱयांशी संवाद
साधला.
सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करण्यास तयार आहे. शेतकऱ्यांनीही चर्चेचे दरवाजे बंद करुन नयेत, असं आवाहन खोत यांनी यावेळी केले.
याच वेळी सदाभाऊंनी शेतकऱ्यांच्या मनात स्वत:ची प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्नही केल्याचं दिसले. मंत्री मंडळात जर शेतकऱ्यांच्या प्रतिनीधीनी जायचं नाही तर, नेमक
कोणी जायचं, व्यवस्था भेदायची असेल तर तीथे जावच लागेल, असं सदाभाऊ म्हणाले.