जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
स्वाभिमानी संघटनेन 4 दिवसांपासून सुरु ठेवलेल्या दूध आंदोलनादरम्यान स्वाभिमानी संघटना आक्रमक असलेली पाहायला मिळाली होती.
स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गोकूळचा टँकर जाळला तर राजू शेट्टी महाराष्ट्र-गुजरात सीमेवर दूध रोखण्यासाठी तळ ठोकून होते.
अनेक ठिकाणी तर दूध रस्त्यावर फेकण्यात आलं. मात्र आता हे दुंधबंद आंदोलन अखेर थांबवण्यात आले आहे.
राज्यात गेल्या 4 दिवसांपासून सुरु असलेले दुधबंद आंदोलन अखेर मागे घेण्यात आले आहे. याची घोषणा स्वत: राजू शेट्टी यांनी गुरुवारी केली आहे.
दूध उत्पादकांना लिटरमागे किमान 25 रुपये भाव तसेच 5 रुपये रुपांतरीत अनुदान देण्याचा राज्य शासनाने घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे.
त्यामुळे या निर्णयाचे स्वागत करीत असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांनी म्हटंले आहे. गुरुवारी सरकारतर्फे दुध दराबाबत मह्त्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या.
त्यानंतर रात्री उशिराने राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नागपुरात भेट घेतली आणि आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
एअरसेल-मॅक्सीस खटल्याच्या नव्या आरोपपत्रात चिदंबरम यांचं नाव
ऐतिहासिक एल्फिस्टन स्थानकाच्या नावात बदल…