जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टींनी पुन्हा एकदा सदाभाऊ खोत यांना डिवचले. आम्ही आमचा हनुमान लंकेत पाठवला पण तो शेपूट तोडून त्यांच्यातच राहिला अशी बोचरी टीका राजू शेट्टींनी सदाभाऊंचं नाव न घेता केली.
नारायण राणेही त्यांच्या पक्षात जातायत, तेव्हा त्यांनी सावधान रहावं असा खास सल्लाही राजू शेट्टींनी दिला. चंद्रकांत दादा स्वत बोगस आहेत अशा शब्दांत त्यांनी महसूलमंत्र्यांचाही समाचार घेतला.
सरकार जाणीवपूर्वक कर्जमाफीचे पैसे देण्यास टाळाटाळ करत आहे. आता लांबवायचे आणि निवडणुका जवळ अले की पैसे द्यायचे असं राजकारण सरकार करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.