जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
दूध बंद आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राजू शेट्टींनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली.
आज म्हणजेच गुरुवारी या आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता निर्माण झाली असून सरकारनं दूध खरेदीचे दर 25 रुपयांपर्यंत वाढवावे अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.
दूध भुकटीच्या निर्यातीसाठी 75 रुपये प्रति किलो अनुदान द्या अशी मागणीही त्यांनी केली.
तसंच याबाबत सरकारला प्रस्ताव दिला असून आता सरकारच्या बोलावण्याची वाट पाहत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
कार्यकर्त्यांना शांततेनं आंदोलन सुरू ठेवण्याचं आवाहनही राजू शेट्टींनी केलं आहे. तसंच मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे.
दूध बंद आंदोलनाच्या चौथ्या दिवशी राजू शेट्टींनी पत्रकार परिषद घेतली
राज ठाकरेंचा सरकारला ‘नीट’ इशारा…
मनसे कार्यकर्ते आक्रमक, मंत्र्यालयासमोरील रस्ताचं फोडला…
गोव्यामध्ये सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्यांवर होणार कारवाई…