Maharashtra Chief Secretary: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नेमणूक

महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव म्हणून राजेश अग्रवाल यांनी नियुक्ती स्वीकारली आहे. राजेश कुमार यांच्या निवृत्तीनंतर त्यांनी पदभार घेतला असून अनुभवी अधिकारी म्हणून त्यांच्या कामकाजाकडे सर्वांचे लक्ष आहे.

Maharashtra Chief Secretary: महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय! राजेश अग्रवाल यांची मुख्य सचिवपदी नेमणूक

Maharashtra Chief Secretary: महाराष्ट्र शासनाच्या वरिष्ठ पातळीवर मोठा बदल करण्यात आला असून, अनुभवी आयएएस अधिकारी राजेश अग्रवाल यांची राज्याच्या मुख्य सचिवपदी निवड झाली आहे. सामान्य प्रशासन विभागात अपर मुख्य सचिव म्हणून काम पाहत असलेले अग्रवाल आता मुख्य सचिव राजेश कुमार यांच्या जागी पदभार स्वीकारणार आहेत. विद्यमान मुख्य सचिव कुमार रविवारी निवृत्त होत असल्याने राज्याच्या प्रशासकीय यंत्रणेतील हा बदल आधीपासूनच चर्चेत होता.

राज्य शासनातील ही नियुक्ती अत्यंत अपेक्षित मानली जात होती. कारण, अनेक वर्षे केंद्र सरकारमध्ये विविध महत्त्वाच्या भूमिकांमध्ये काम केल्यानंतर राजेश अग्रवाल गेल्या महिन्यातच राज्य सेवेत परतले होते. त्यावेळेपासूनच त्यांच्या मुख्य सचिवपदी नियुक्तीची शक्यता जवळपास निश्चित मानली जात होती. 1989 च्या बॅचचे हे वरिष्ठ आयएएस अधिकारी महाराष्ट्र कॅडरचे असून, त्यांचा प्रशासकीय अनुभव अतिशय व्यापक आहे.

हेही वाचा: Uddhav Thackeray On BJP: 'भाजपच्या प्रचारात सत्तेचा माज दिसतोय…'; उद्धव ठाकरेंचा महायुती सरकारवर जोरदार निशाणा

पंजाबमधील जालंधर येथे जन्मलेले अग्रवाल यांनी दिल्ली आयआयटीमधून कॉम्प्युटर सिस्टिम्समध्ये बीटेक पदवी घेतली. त्यांच्या शैक्षणिक पार्श्वभूमीमुळे ते प्रशासकीय क्षेत्रात तंत्रज्ञानावर आधारित सुधारणा आणि डिजिटलायझेशनवर नेहमीच भर देतात, अशी ओळख त्यांच्या कामातून दिसून येते.

सेवाकाळात त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर कार्य केले आहे. सहायक जिल्हाधिकारी म्हणून रत्नागिरी येथील त्यांच्या कार्यकाळाची सुरुवात झाली. त्यानंतर जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अकोलाचे जिल्हाधिकारी, तसेच कृषी, मत्स्यव्यवसाय, सामाजिक न्याय अशा विविध विभागांमध्ये सचिव म्हणून त्यांनी महत्त्वपूर्ण जबाबदाऱ्या सांभाळल्या. वित्त आणि माहिती तंत्रज्ञान विभागातील त्यांचे काम विशेष उल्लेखनीय मानले जाते.

राज्याबरोबरच केंद्र सरकारमध्येही त्यांनी अनेक संवेदनशील पदांवर काम केले आहे. नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे उपविशेष आयुक्त, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव, भारत निवडणूक आयोगातील संचालक, कौशल्य विकास विभागाचे महासंचालक (प्रशिक्षण), तसेच पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयात अतिरिक्त सचिव म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या विविध अनुभवामुळे त्यांची काम करण्याची पद्धत अधिक व्यापक आणि परिणामकारक बनली असल्याचे सहकारी अधिकारी सांगतात.

हेही वाचा: Shirdi Eknath Shinde : …आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विमानतळावरच धावू लागले, 'तो' व्हिडीओ व्हायरल

मुख्य सचिव म्हणून त्यांचा कार्यकाल एक वर्षाचा असणार आहे. ते पुढील वर्षी नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार असल्याचे शासकीय सूत्रांनी सांगितले. त्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासनातील समतोल बदलले असून, या पदासाठी अपेक्षित असलेले काही वरिष्ठ अधिकारीN इक्बालसिंग चहल, भूषण गगराणी आणि दीपक कपूर यांना आता या पदाची संधी हुकली आहे.

महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याच्या प्रशासकीय कामकाजात मुख्य सचिवांची भूमिका मोलाची असते. राज्यातील विकासकामे, विभागांमधील समन्वय, तसेच धोरणात्मक निर्णयांमध्ये त्यांचा थेट सहभाग असतो. त्यामुळे अग्रवाल यांच्या नियुक्तीकडे प्रशासन, राजकीय वर्तुळ आणि नौकरशाहीतून मोठ्या उत्सुकतेने पाहिले जात आहे. त्यांच्या अनुभवामुळे राज्यातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number