वृत्तसंस्था, नवी दिल्ली
जर तुमचं राजधानी एक्सप्रेसचं तिकिट पक्क झालं नसेल तर तुम्हाला लवकरच विमानानं प्रवास करणे शक्य होणार आहे. एअर इंडियाचे अध्यक्षपदी असताना अश्विनी लोहानी य़ांनी टर्नअराऊंड मॅन ही योजना रेल्वे समोर मांडली होती. पण, तेव्हा लोहानी यांच्या योजनेला रेल्वेनं हवा तसा प्रतिसाद दिला नव्हता.
मात्र, आता जेव्हा लोहानी इंडियन रेल्वेचे अध्यक्ष झाले तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा या योजनेची पूर्तता करण्याचा ठरवलंय मात्र, विमानानं जायचं तर पैसे ही जास्त मोजावे लागणार असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण, घाबरू नका. कारण राजधानी तिकिटा एवढेच पैसे तुम्हाला विमानाच्या तिकिटासाठी मोजावे लागणार आहेत.