जय महाराष्ट्र न्यूज, राजापूर
कोकणात रिफायनरी हा प्रकल्प आधी गुहागर येथे होणार होता. पण तिथल्या ग्रामस्थांनी विरोध केल्यामुळे हा प्रकल्प रत्नागिरी जवळ होत आहे. तिथल्या ग्रामस्थांनी याला कडाडून विरोध केला आहे.
हा प्रकल्प विनाशकारी असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय. या गावकऱ्यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.
या प्रकल्पासाठी उद्योग मंत्री सुभाष देसाई आग्रही आहेत. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी हा प्रकल्प ग्रामस्थांना नको असेल तर आम्ही रद्द करू असं आश्वासन दिलं होतं आणि हेच आश्वासन उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवरच्या भेटीत ग्रामस्थांना दिलं आहे.