जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेच्यावतीनं राज ठाकरे यांच्या हस्ते बेरोजगार महिलांना त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाह चालावा यासाठी रिक्षा परवाना काढून देण्यात आले आहेत. मुंबईतील मराठी महिलांना या संधीचा लाभ घ्यावा यासाठी मुलुंडमधील 200 महिलांना रिक्षा परवाना मिळवून त्या परवान्यांचे वाटप करण्यात आले.
यावेळी या महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे पूर्वी रिक्षा परवाना 200 रुपयात मिळायचा. आता 15 हजार रुपयांत राज्यसरकार देते. त्यामुळे हा परवाना 200 रुपयातच मिळावा अशी मागणी महिलांनी राज ठाकरे यांच्याकडे केलीय.
मुलुंडमधील या महिलांना रिक्षाचे परवाने मिळाले म्हणून मोठ्या संख्येने कृष्णकुंज येथे येऊन राज ठाकरेंचे आभार मानले.