जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मुंबई महापालिकेतील मनसेचे नगरसेवक शिवसेनेनं फोडल्यामुळं दुखावलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर अत्यंत कठोर शब्दांत हल्ला चढवलाय. शिवसेनेने पाच- पाच कोटी रुपये देऊन नगरसेवक फोडले घाणाघाती आरोपही राज ठाकरेंनी शिवसेनेवर केला
नगरसेवक फोडून उद्धवने नीच राजकारण केलंय. मी हे कधीच विसरणार नाही आणि विसरलो नाही हे भविष्यात दिसेल असा स्पष्ट इशारा राज ठाकरेंनी दिलाय.
यापुढं हातावर नाही फक्त गालावर टाळी दिली जाईल, असं सांगत राज यांनी शिवसेनेविरोधात संघर्षाचा शंखच फुंकलाय.