जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
महाराष्ट्रातून मराठी भाषा संपवण्याचे षडयंत्र सुरु असल्याचं मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणालेत.
मराठी भाषेला अभिजात साहित्याचा दर्जा कधी मिळणार. मराठी साहित्यिक गप्प का आहेत? असा सवालही राज ठाकरेंनी यावेळी केलाय.
तसेच मराठी माणूस टिकला तरचं मराठी टिकेल. महाराष्ट्राच्या हितासाठी मी लढणार असल्याची प्रतिक्रिया देखील राज ठाकरेंनी दिलीय.
यावेळी मुंबई-अहमदाबाद सुरु होणाऱ्या बुलेट ट्रेनवरून त्यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष केलंय. सांगलीत औदुंबर साहित्य संमेलनात राज ठाकरे बोलत होते.