जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
फेरीवाल्यांच्या मुद्द्यावरून भाजप प्रवक्ते संजय ठाकूर यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर निशाणा साधलाय.
राज ठाकरेंच्या सांगण्यावरून फेरीवाल्यांविरोधात मनसेने मोहीम हाती घेतलीय. त्यामुळे राज ठाकरेंवर गुन्हा दाखल करावा अशी मागणीही त्यांनी केलीय.
याचवेळी त्यांनी काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम आणि शिवसेनेवरही टीका केलीय. संजय निरूपम आणि शिवसेना फेरीवाल्यांच्या मुद्द्याचा फायदा घेऊ पाहतंय असा आरोप संजय ठाकूर यांनी यावेळी केला.