जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
राज्यात माथी भडकवुन जातीपातीच राजकारण करण्याचा उद्योग महाराष्ट्रात सुरु असल्याची टीका राज ठाकरे यांनी केली.
निवडणुक जिंकण्यासाठी राजकारण्यांचा हा खटाटोप सुरु आहे फक्त पुतळे उभारुन काहीही होणार नाही अशी टिकाही राज ठाकरे यांनी केली.
केंद्रातील आणि राज्यातील सरकार हे फक्त थापाड्यांच सरकार आहे.
देवेंद्र फडणवीस रोज नवे आकडे देतात. मुख्यमंत्री रतन खत्रींकडे कामाला होते काय असा प्रश्न पडतो असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
धर्मा पाटील हे विष पिवुन तडफडत असताना मुख्यमंत्र्यांचे स्विझर्लंड मधील बर्फ अंगावर घेतानाचे फोटो प्रसिद्ध होतायेत ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका असल्याचे राज ठाकरे म्हणाले.