आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कंबर कसली आहे. मनसे नेते राज ठाकरे राज्यातील नाशिक, औरंगाबाद आणि पुणे या तीन प्रमुख शहरांचा दौरा करणार आहेत. आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत.
नाशिक दौऱ्यादरम्यान राज ठाकरे यांच्या हस्ते मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. तसेच त्यांच्या उपस्थितीत मध्यवर्ती कार्यालयात काही राजकीय पदाधिकारी मनसे पक्षामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत.
निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे नाशिक नंतर औरंगाबाद दौऱ्यावर जाणार आहेत. सायंकाळी पाच वाजता औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंपवर त्यांचा सत्कार होणार आहे. औरंगाबाद दौऱ्यादरम्यान मंगळवारी राज ठाकरे शहरातील मंगल कार्यालयात मराठवाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीदरम्यान निवडणुकीबाबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच या बैठकित पत्रकारांना प्रवेश करता येणार नाही.